Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
अॅलोपॅथीवर आयुर्वेदाचा योगोपचार

मध्यमवर्गीय कुटुंबात स्वप्नील सुरेश महाजन यांचा जन्म. तीन भावंडांपैकी एकाने तरी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करावे, असे वडिलांची इच्छा होती. स्वप्नील यांना विज्ञान विषयाची आवड असल्यामुळे त्यांच्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न रुजले. त्यांनीही हे आव्हान स्वीकारत वैद्यकीय क्षेत्राकडे वाटचाल सुरु केली. अपेक्षेप्रमाणे एमबीबीएसला प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे आयुर्वेद शिकण्यासाठी बेळगाव येथील केएलई महाविद्यालयात प्रवेश घेतला. बेळगाव हे मिश्र भाषिक शहर असल्याने त्याठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये फारसा अनुभव मिळाला नाही. पर्यायाने ऍलोपॅथीकडे वळावे लागले. पुण्यात डॉ. कर्वे, डॉ. केळकर, डॉ. पाटील यांच्याकडे ऍलोपॅथीचे अनुभव घेऊन जानेवारी 2005 मध्ये त्यांनी मयुरेश क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरु केली.
दरम्यान काही केसेसमध्ये ऍलोपॅथीद्वारे फक्त लाक्षणिक चिकित्सा करता येते व आजाराच्या मूळापर्यंत जाता येत नाही, असे स्वप्नील यांच्या लक्षात आले. तेव्हा आयुर्वेद कॉलेजमधील लेक्चर आठवायला लागले. त्यातून त्यांना पुन्हा आयुर्वेदाची ओढ निर्माण झाली व नव्याने आयुर्वेद शिकण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु झाले. 2012 मध्ये माधवबागला एक पंचकर्माचा कोर्स केला. त्यावेळी बहुतांशी तज्ज्ञांनी काही प्रात्यक्षिके करून दाखविली. त्याबाबत काही महत्वपूर्ण सूचनाही केल्या. या सर्वांचे पालन करून करून त्यांनी आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सा सुरु केली. या सर्व प्रवासात त्यांना त्यांचा मित्र डॉ. सगरे यांची व डॉ. यशवंत भगत यांची साथ आणि मार्गदर्शन मिळाले. सगरे हे सध्या सांगली येथे, तर डॉ. भगत हे बारामती येथे यशस्वी आयुर्वेदिक प्रक्टिस करत आहेत.
केशायुर्वेदविषयी विचारले असता स्वप्नील म्हणतात, “काही वर्षांपूर्वी डॉ. सगरे यांनी सांगलीमध्ये डॉ. जंगम यांच्याकडे केशायुर्वेद सुरु झाल्याचे मला सांगितले. त्यावेळी केशायुर्वेदबाबत अधिक माहिती जाणून घ्यावीशी वाटली. यापूर्वी नाडी परीक्षा या विषयावर माझे आणि वैद्य हरीश पाटणकर यांचे एकदा बोलणे झाले होते. परंतु, केशायुर्वेदबाबत ऐकल्यानंतर त्यांना मी प्रत्यक्ष भेटलो आणि या क्षेत्रामध्ये माझी दिशाच बदलुन गेली. दरम्यान मी माझ्या दोन मित्रांकडे वैद्य पाटणकर यांचा उल्लेख केल्यावर त्यांनीही त्यांच्याबद्दल खूप चांगले अनुभव सांगितले. त्यापैकी एक म्हणजे बारामतीमधील योगाचार्य डॉ. निलेश महाजन आणि दुसरे म्हणजे कोथरूडचे डॉ. स्वप्नील घाडगे. योगायोग म्हणजे दोघांनीही केशायुर्वेदबाबत सकारात्मक गोष्टी सांगितल्या. केशायुर्वेदसोबत काम केले, तर वैद्य पाटणकर तुला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील. गम्मत म्हणजे प्रत्यक्षात तसेच घडते आहे. 19 जुलै 2017 रोजी केशायुर्वेद सोबत काम करण्यास सुरुवात केली आणि आज मी बारामती परिसरामध्ये केस आणि त्वचा विषयीचा तज्ज्ञ, आयुर्वेदाचार्य अर्थात केशायुर्वेदाचार्य संबोधला जातो, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.”
केशायुर्वेदसोबत काम सुरु केल्यानंतर डॉ. स्वप्नील यांना लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याविषयी लोकांच्या मनात विश्वास वाढत आहे. केशायुर्वेदची वाढणारी लोकप्रियता आणि उत्तम रिझल्ट्स यामुळे गेल्या तीन वर्षात उत्तम कामगिरी करणार्या केशायुर्वेदच्या शाखांमध्ये पहिल्या 10 शाखांत डॉ. स्वप्नील यांचा समावेश आहे. आता त्यांच्या वैद्यकीय सेवेतही आमुलाग्र बदल झाला आहे. आयुर्वेदात नवनवीन प्रयोग करणारा वैद्य अशी त्यांची ओळख झाली आहे. वैद्य हरीश पाटणकरांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून केशायुर्वेदाचे एक विश्व निर्माण केले आणि मी त्याचा एक भाग आहे, याचा मला सार्थ अभिमान असल्याची भावना डॉ. स्वप्नील मांडतात.
केशायुर्वेद चालविताना खूप चांगले अनुभव आले. अगदी 8 वर्षाच्या शाळकरी मुलीचे पिकणारे केस, 60 वर्षाच्या गृहिणीचे गळणारे केस, कोणाचे लग्न जमत नाही, तर कोणाला कॉलेजमध्ये जाताना केसांच्या समस्यांमुळे मनात निर्माण झालेला न्यूनगंड, चेहर्यावर आलेली मुरमे अशा बहुतांशी रुग्णांना केशायुर्वेदमार्फत रिझल्ट्स व विश्वास मिळून दिला. केशायुर्वेद अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ते पॅम्प्लेट्स व्हॉटसअप आदी सोशल मीडियाचा उपयोग करून जास्तीत जास्त पोहचविण्याचा प्रयत्न करत आहेत. याव्यतिरिक्त वैद्य हरीश पाटणकरांसह इतर वैद्यांचा टीव्हीवरुन होणारा कार्यक्रम यामुळे केशायुर्वेद जनमानसांत पोहोचत आहे.
आपले ज्ञान केवळ केसांच्या बाबतीत संकुचित न ठेवता प्रत्येक आजाराबाबत चिकित्सा करण्यावर भर द्यावा, अशी आपली इच्छा असल्याचे डॉ. स्वप्नील सांगतात. आयुर्वेद आणि योग हे एक खूप चांगली संयुक्त उपचार पद्धती म्हणून विकसित झाली पाहिजे. जसे योग शास्त्राला जगमान्यता मिळाली तशीच आयुर्वेद आणि योग संयुक्त उपचार पद्धतीलाही ती मान्यता मिळावी, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. केशायुर्वेदसोबत काम करताना अनेकांकडून कौतुकाची थाप मिळाली. त्यामुळे आपले कार्य एका योग्य दिशेने सुरु आहे, असा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. तसेच केशायुर्वेदतर्फे केशायुर्वेद मित्र पुरस्कार, क्लिनिक ऑफ द इयर पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. केशायुर्वेदला जास्तीत जास्त सॅम्पल्स संशोधनासाठीही डॉ. स्वप्नील महाजन योगदान देत आहेत.